अल्पवयीन बांग्लादेशी मुलीकडून वेश्याव्यवसाय, तिघे गजाआड
Prostitution Business: बांग्लादेशमधील एका १६ वर्षाच्या मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात बांग्लादेशमधील एका १६ वर्षाच्या मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक (Arrested) केली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील सेनानगरातील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश करत या प्रकरणात २० जानेवारीला मोठी कारवाई देखील केली होती. तसेच या प्रकरणात पाच जणांना अटक देखील केली होती. यानंतर संभाजीनगर शहरात बांग्लादेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात न्यायालयाने त्यांना २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या दलालांकडून मुलगी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या दलालाचा शोध सुरू केला असून एक अधिकारी आणि चार पोलिसांचे पथक पुण्याला रवाना करण्यात आले आहे.
Web Title: Prostitution by minor Bangladeshi girl three arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study