Home महाराष्ट्र अमेरिकेच्या मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ, तरुणाचे कांड  

अमेरिकेच्या मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ, तरुणाचे कांड  

Breaking News | Mumbai Crime: इंटरनेटच्या माध्यमातून लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश.

Pornographic photos and videos of American girls, scandal of a young man

मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोन जणांना सीबीआयने अटक केली आहे. तसेच, या प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, दिल्ली आणि मँगलोर येथे छापेमारी करत इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

अमेरिकी तपास यंत्रणेच्या मदतीने सीबीआयने ऑपरेशन हॉक या नावाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिला आरोपी शेख मुईझ हा मँगलोरचा

रहिवासी असून सोशल मीडियावर खोट्या नावाने अकाउंट सुरू करून तो अमेरिकेतील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चॅटिंग करत होता. तसेच या मुलींना जाळ्यात ओढून त्याने या मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील मागवले होते. तर, दुसऱ्या प्रकरणात मुकुल सैनी या दिल्लीस्थित व्यक्तीनेही सोशल मीडियावर खोट्या नावाने खाते सुरू करून याच प्रकारे अमेरिकेतील अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ जमा केले होते. त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

Breaking News: Pornographic photos and videos of American girls, scandal of a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here