संगमनेरात पोलिसांचा छापा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त
Sangamner News: प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू असा एकूण २८,९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा (Raid) टाकून जप्त.
संगमनेर: प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू असा एकूण २८,९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. गुरुवारी (दि. २१) संध्याकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत नानासाहेब घुले (३७, रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गोल्डन सिटी परिसरात प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस पथक कारवाईसाठी गेले असताना त्यावेळी त्यांनी घुले याच्या घराशेजारी असलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये जाऊन पोलिस पाहिले असता तेथे प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संगमनेर शहर ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Police raid Sangamaner Pan masala, aromatic tobacco seized
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App