अकोलेत पोलिसांचा लॉजवर छापा, दोघांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Breaking News | Akole: नामांकित हॉटेल मल्हार प्लाझा लॉजिंगवर अकोले पोलिसांनी बुधवारी छापा मारला.
अकोले : शहरातील राजुर रोडवरील नामांकित हॉटेल मल्हार प्लाझा लॉजिंगवर अकोले पोलिसांनी बुधवारी छापा मारला. यावेळी प्रेमाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला येथे आणून तिचा विनयभंग करणारा आरोपी सूरज विठ्ठल माने (राहणार तांभोळ) याच्यासह हॉटेलचा मालक रामहारी चौधरी यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अकोले शहर व परिसरात हॉटेल व लॉज परिसरात अनेक अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा होती. यावरून अकोले पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार बुधवारी दुपारी पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खांडबहाले यांच्या पथकाने अकोले शहरातील राजुर रोडवरील हॉटेल मल्हार प्लाझा लॉजिंगवर छापा मारला. यात हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत एक अल्पवयीन
मुलगी एका तरुणासोबत, एक विवाहित महिला, पुरूष तसेच एक अन्य विवाहित जोडपे सापडले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टर तपासले आणि त्या सर्व जोडप्यांना अकोले पोलिस स्टेशनला आणले. यावेळी त्यांचे नातेवाईकही पोलिस स्टेशनवर उपस्थित झाले. अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यावरून अकोले पोलिसांनी गुन्हा रजिस्टर केला. अकोले शहरातील हॉटेल व लॉज परिसरात असे अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती असताना नागरिकांनी पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात समजलेल्या माहितीप्रमाणे, अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून हॉटेलच्या लॉजिंगमध्ये नेण्यात आले होते, जिथे आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास अकोले पोलिस करत आहेत.
Web Title: Police raid lodge in Akole, case registered against two under POCSO