अहिल्यानगर: अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: युवकाचा जागीच मृत्यू.
पाथर्डी: पाथर्डी शहरातील मध्यवर्ती आणि वाहतूकगर्दीचा मुख्य केंद्र असलेल्या कोरडगाव चौकात गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. या अपघातात विकास परमेश्वर सोनवणे (वय 20, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विकास हा दुचाकीवरून कोरडगावच्या दिशेने जात असताना, त्याच दिशेने जाणार्या लाकडांनी भरलेल्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच त्याचा प्राण गेला. कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्ग या चौकातून जात असल्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रस्त्यालगत हातगाड्या उभ्या असणे, दुकानदारांची गर्दी आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे कोरडगाव चौक सातत्याने अपघातांचे केंद्रबिंदू बनलेला आहे. यापूर्वीही या चौकात अनेक अपघात (Accident) घडले असून, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली होती.
घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. त्यानंतर संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Web Title: Bike rider dies on the spot Bike rider dies on the spot