Home औरंगाबाद Loan: उधारीचे पैसे देत नसल्यामुळे त्याच्या दुकानासमोर चक्क ठेवला बॉम्ब

Loan: उधारीचे पैसे देत नसल्यामुळे त्याच्या दुकानासमोर चक्क ठेवला बॉम्ब

planted a bomb in front of his shop because he did not pay the loan

औरंगाबाद: मित्राकडे असलेले उधारीचे पैसे (Loan) सातत्याने मागून देखील परत करत नसल्याने त्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्या फर्निचरच्या दुकानासमोर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (वय 26वर्षे,  म्हाडा कॉलनी, कन्नड जी.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात चार दिवसांपूर्वी बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडली होती. मात्र अखेर पोलिसांनी बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आहे. मित्राकडे असलेले उधारीचे पैसे अनेकदा मागून सुद्धा परत करत नसल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी एका ईलेक्ट्रीकलची दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने हा बॉम्ब ठेवला असल्याचे समोर आले आहे. धडा शिकवण्यासाठी किरण राजगुरू यांच्या दुकानासमोर रामेश्वरने घातपात करण्यांचे उद्देशाने बॉम्ब ठेवला होता. यावरून रामेश्वर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  9 जून रोजी कन्नड शहरातील मुख्य मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्स मध्ये कमी तिव्रतेचा बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकांने अत्यंत सुरक्षितपणे त्याला हाताळुन निर्जनस्थळी नेऊन नष्ट केला होता. यावरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड शहर व ग्रामीण पोलीसांचे 4 पथके तयार करून घटनेच्या अनुषंगाने तपास सुरु केला.

दरम्यान, कन्नड येथील हिवरखेडा रोडवर इलेक्ट्रीकल व रुद्रा रेफ्रीजरेशन नावाची दुकान चालवणारा रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे याने हा बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. मात्र त्यांनतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: planted a bomb in front of his shop because he did not pay the loan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here