Home संगमनेर संगमनेरात चाकूने एकास भोकसले, युवक जखमी

संगमनेरात चाकूने एकास भोकसले, युवक जखमी

Sangamner Crime: किचनमधील चाकूने फिर्यादीच्या डोक्यात, मानेवर, पोटावर वार करत गंभीर जखमी दोघांवर गुन्हा दाखल

person was stabbed with a knife in Sangamnera, the youth was injured

संगमनेर – शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बसस्थानक परिसरात वारंवार वेगवेगळ्या घटना घडत असतात. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मागील भांडणातून एका तरुणाने त्याच्याकडे असणाऱ्या किचनमधील चाकूने फिर्यादीच्या डोक्यात, मानेवर, पोटावर वार करत गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या मित्राला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी मयूर नितीन अभंग वय १८ रा. राजवाडा, संगमनेर व त्यांचा मित्र बसस्थानक समोरील येवले चहा येथे उभे असताना आरोपी आदित्य दिपक दारोळे व त्यांचा मित्र निखिल रोकडे तेथे आले. त्यांनी मागील भांडण उकरून काढून फिर्यादी मयूर नितीन अभंग व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी आदित्य दारोळे याने त्याच्याकडे असणाऱ्या किचनमधील छोट्या चाकूने मयूर याच्या डोक्यात, मानेवर, पोटावर वार केले. यात मयूर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मयूर अभंग याच्या फिर्यादीवरुन वरील दोघां जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर. ४८ बी.एन.एस. कलम ११८(१),११५, ३५१ (२), ३५२(२) ३ (५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

Web Title: person was stabbed with a knife in Sangamnera, the youth was injured

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here