अहिल्यानगर: उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तरुणाचा मृत्यू
Ahilyanagar Accident: उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मेंदूला जबर मार लागून तरुणाचा मृत्यू ा.
श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरातून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मेंदूला जबर मार लागून तरुणाचा मृत्यू ा. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू आहे.
मयत योगेश मिसाळ (वय २५) हा युवक पुण्याहून दुचाकीवरून श्रीरामपूरकडे जात होता. बेलापूर खुर्द परिसरात समोरून उसाने भरलेल्या दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर चालला होता. ट्रॅक्टरचा धक्का लागल्यामुळे योगेश मिसाळ दुचाकीवरून खाली पडला. तो ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलापूर दूरक्षेत्राचे पोलिस अपघातस्थळी गेले. मृतदेहाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
Web Title: Youth found dead under sugarcane tractor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News