Suicide: शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
Ahmednagar News Live | Pathardi Suicide | पाथर्डी: तालुक्यातील भोसे गावचे शेतकरी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसाराम नानाभाऊ टेमकर (वय वर्षे ६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत त्यांचा मुलगा बाळासाहेब टेमकर यांनी माहिती दिली आहे की, माझे वडील असाराम टेमकर यांनी भोसे सेवा संस्था व करंजी येथील राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची त्यांना परतफेड करणे शक्य होत नव्हते. इतरही काही जणांकडून त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते. त्यांचाही तगादा वाढला होता.
या सर्व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शुक्रवारी ७ जानेवारीला शेतामध्ये विषारी औषध घेतले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान १० जानेवारीला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोसे येथील या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेल्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Pathardi Farmer commits suicide due to debt