Home महाराष्ट्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूत उपचार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूत उपचार

Lata Mangeshkar Corona Positive

Lata Mangeshkar Corona Positive: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे. मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दीदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असं म्हटलं जातं. लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Lata Mangeshkar Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here