Home महाराष्ट्र Sharad Pawar:  शरद पवार पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar:  शरद पवार पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar admitted:  शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणार.

Ncp Sharad Pawar admitted in breach candy hospital

Sharad Pawar:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान ३ नोव्हेंबरला शरद पवार शिर्डीला जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Ncp Sharad Pawar admitted in breach candy hospital

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here