नाशिक-पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन, दोन तासांचा प्रवास, निधी मंजूर
पुणे | Nashik Pune railway train: नाशिक-पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता नाशिक-पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार आहे.
नाशिक-पुणे ३३५.१५ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही २० पैकी १९.६ टक्के निधीला मान्यता दिली राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या ३२ कोटींच्या निधीला आधीच मान्यता दिलेली आहे. समभागातून ६० टक्के निधी उपलब्ध आहे.
त्यामुळे आता नीती आयोग आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम चार महिन्यांत सुरू होणार आहे.
नाशिक, अहमदनगर आणि पुणे हे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जातील. संगमनेर तालुक्यातून हा मार्ग जोडला गेला आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या २० टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता. वित्त आयोगाने २० पैकी १९.६ टक्के निधीला मान्यता दिली आहे.
या मार्गावरील स्थानके अशी असणार आहेत.
पुणे जिल्ह्यात १२, नगर जिल्ह्यात ६ आणि नाशिक जिल्ह्यात चास, दोडी , सिन्नर, माेहदरी, शिंदे आणि नाशिक राेड अशी ६ स्थानके असतील. प्रतितास असलेली गती २५० किलाेमीटर या वेगाने रेल्वे धावणार आहे. प्रत्येक ७५० मीटर अंतरावर, रेल्वे मार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला येण्या-जाण्याची सुविधा असेल. या ट्रेनमुळे तीनही जिल्हांना सुविधा प्राप्त होणार आहे.
Web Title: Nashik Pune railway train