सोशियल मेडियाच्या माध्यमातून ओळख करून शाळकरी मुलीवर बलात्कार
बीड | Beed sexual assualt minor girl: शहरात राहणाऱ्या एका नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलीसोबत बी.एस्सी शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाने ओळख करत मैर्त्रीतून प्रेम करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे
16 फेब्रुवारी रोजी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. शेख समीर शेख अजिमोद्दीन (वू-21) रा. बीड असे त्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी आरोपी शेख समीर याची सोशल मीडियावरून शहरातील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यांनतर त्या दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 10 फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला घेऊन बीडमधून पलायन केले होते. त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन ते तेथे राहिले होते. तिथे त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार (rape) केला आहे. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या जबाबावरून कलम 376 सह पोस्को आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिलांनी सोशियल मेडीयाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी केले आहे.
Web Title: Rape of a schoolgirl by introducing her through social media