Home संगमनेर संगमनेर: अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, दोघांना अटक

संगमनेर: अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, दोघांना अटक

Breaking News | Sangamner Crime: अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Murder of youth due to moral relationship, two arrested

संगमनेर:  सिन्नर व संगमनेर तालक्यातील हद्दीत ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी काहंडळवाडी शिवारात रोडच्या कडेला असलेल्या शेतातील काट्यात दिलीप भाऊसाहेब सोनवणे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) याचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे आढळून आले होते तसेच त्याला सोबत घेऊन जाणारे त्याचे साथीदार देखील फरार असल्याने वावी ता. सिन्नर पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासात दोन आरोपींना इगतपुरी रेल्वे स्थानकावरून जेरबंद केले आहे. आरोपींनी सदर खुनाची कबूली दिली आहे.

मयत दिलीप भाऊसाहेब सोनवणे (रा-चिंचोली गुरव, ता. संगमनेर जि. अहमदनगर) याच्या डोक्यावर मानेवर दगडाने वार करून त्यास ठार मारण्यात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रमाणे वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १४८/२०२४ भा.द.वी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपासाच्या दरम्यान मयत दिलीप सोनवणे याच्या सोबत राहणारा त्याचा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाठ (रा.चास ता. सिन्नर) यांनी दिलीप सोनवणे याचा खून केल्याची माहिती पोलीसांना मिळाली. गुन्हा घडल्यापासून कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे देखील फारार होते व त्यांचे मोबाईल देखील बंद येत होते. वावी पोलीस ठाणे व स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान शुक्रवार ५ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे कसारा रेल्वे स्टेशन जि. ठाणे परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे शाखेकडील पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस यांनी कसारा स्टेशन परिसरात सापळा रचून कृष्णा जाधव व अजय शिरसाठ यांना शीताफिने ताब्यात घेतले. आरोपी कृष्णा जाधव (वय वर्ष २२) व अजय शिरसाठ (वय वर्षे २३) यांच्याकडे खूनाच्या गुह्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी सदर खुनाच्या गुन्हाची कबुली दिली. सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर आरोपींना पुढील तपास कामी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले.

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, नवनाथ सानप, विनोद टीळे, विश्वनाथ काकड, हेमंत गीलबिले, प्रदीप बहिरम, चालक विकी म्हस्दे इगतपुरी पोस्ट कडील ए.एस आय. गणेश परदेशी, अभिजित पोटिदे यांनी आरोपींनी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.

Web Title: Murder of youth due to moral relationship, two arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here