मुलाच्या मृत्यूमुळे आईने पेटवून घेत केली आत्महत्या
Dhule Suicide Case: महिलेने मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्यामुळे पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना.
धुळे: शहरातील मोहाडी उपनगरातील महिलेने मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्यामुळे पेटवून घेत आत्महत्या केली. मालुबाई वायकर असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, शंकर पांडू नगर येथे राहणाऱ्या उमेश प्रल्हाद वायकर या तरुणाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. त्यामुळे वायकर कुटूंबिय दुःखात होते. उमेशच्या मृत्यूमूळे त्याची आई मालुबाई प्रल्हाद वायकर वय. 50 यांची मनस्थिती बिघडली होती. घरी कोणी नसताना मालुबाई यांनी पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी अत्यवस्थ स्थितीत मालुबाई यांना हिरे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
Web Title: mother committed suicide by setting herself on fire due to the death of her son
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study