Home अहमदनगर विवाहितेचे नगरमधून अपहरण करुन ठेवले आष्टीला डांबून मारहाण

विवाहितेचे नगरमधून अपहरण करुन ठेवले आष्टीला डांबून मारहाण

Breaking News | Ahmednagar:  नाजूक कारणातून सहा जणांनी विवाहितेचे नगरमधून अपहरण करून मारहाण.

married woman was abducted from the city and kept in abeyance

अहमदनगर: नाजूक कारणातून सहा जणांनी विवाहितेचे नगरमधून अपहरण करून तिला धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथे एक दिवस डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात अपहरण, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालींदा भाऊसाहेब साबळे (रा. झोपडी कैन्टींग, नगर), मालन बाळासाहेब गायकवाड (रा. सुलेमान देवळा ता. आष्टी, जि. बीड), सुलोचना दत्तात्रय गाडे (रा. दादेगाव ता. आष्टी, जि. बीड), पोपट अबाज़ी खुडे (रा. केडगाव, नगर), प्रशांत आबाजी खुडे, भिमराव श्रावण अढागळे (दोघे रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी विवाहिता मुळच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून त्या सध्या सावेडी उपनगरात भाडोत्री बंगल्यात एकट्याच राहतात. त्यांचे पती कामानिमित्त मुंबई येथे व दोन मुली बडिलांकडे आष्टी तालुक्यातील एका गावात राहतात. फिर्यादी नगरमध्ये एका ठिकाणी मजुरीचे काम करतात. त्या सोमवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता त्या सध्या राहत असलेल्या ठिकाणी कालींदा साबळे, मालन गायकवाड, सुलोचना गाडे, पोपट खुडे, प्रशांत खुडे, भिमराव अढागळे असे सर्व जण आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. रिक्षातून नगर शहरातील चांदणी चौक येथे व तेथून टेम्पोतून धानोरा येथे नेले. तेथे गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा मारहाण केली व भिमराव अढागळे याच्या घरात बळजबरीने डांबून ठेवले. मंगळवारी (दि. ९) दुपारी दोन वाजता कालींदा साबळे हिने हिने फिर्यादीला घराच्या बाहेर काढून नगर येथे माळीवाडा बस तोफखाना पोलीस ठाण्यात आल्या व त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी सायंकाळी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर करीत आहेत.

Web Title: married woman was abducted from the city and kept in abeyance

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here