अकोले, कोतूळमध्ये ‘लव्ह जिहाद’, निषेध, बंदची हाक मात्र…
Akole News: अकोले बंद असताना शहराजवळील एका मंदिर परिसरात दोन वेगळ्या समाजातील प्रेमी युगुल अश्लील चाळे करताना आढळून आल्याने चोप.
अकोले: अकोले बंद असताना शहराजवळील एका मंदिर परिसरात दोन वेगळ्या समाजातील प्रेमी युगुल अश्लील चाळे करताना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. यानंतर त्यांना चांगला चोप देत त्यांना अकोले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान या घटनेमळे अकोले पोलिस ठाण्यात शहर व परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलिस स्टेशनच्या गेटवरच काही वेळ ठिय्या आंदोलन केले. अश्लील चाळे करणार्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता
लव्ह जिहाद च्या वाढत्या घटनांचा यावेळी निषेध करत उद्या बुधवारी पुन्हा अकोले शहर बंद ठेवण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र शहर दुसर्या दिवशीही बंद नको असा पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी शहरातील व्यापार्यांनीही या घटनेचा निषेध करत नाराजी व्यक्त केली. यावेळी अकोले पोलिसांना एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन पोलिस उपनिरीक्षक भुषण हंडोरे यांनी स्वीकारत सर्वांना शांततेचे आवाहन केले.
Web Title: ‘Love Jihad’ in Akole, Kotul, protest, bandh call but
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App