संगमनेरात दोन घटना, महिलांच्या गळ्यातील गंठन ओरबाडले
Breaking News | Sangamner: दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन सोनसाखळी चोरांनी ओरबाडून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना.
संगमनेर: दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन सोनसाखळी चोरांनी ओरबाडून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना मंगळवारी (दि.२१) सकाळी ८.४५ ते ९.१५ वाजेच्या सुमारास मालदाड रस्ता परिसर आणि घुलेवाडी येथील साखर कारखाना, मराठी शाळेजवळ घडल्या. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ५४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. संगीता कैलास राठी (वय ५४, रा. लहू कॉलनी, मालदाड रस्ता, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा सोनसाखळी चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला. राठी या पोस्ट कार्यालयात आरडीचे काम करतात. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या भाजी घेण्यासाठी मालदाड रस्ता येथे गेल्या होत्या, ८.४५ वाजेच्या सुमारास घरी जात असताना लहू अकुश कॉलनी येथे त्यांच्या पाठीमागून दोघेजण लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आले आणि थोडे पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन त्यांनी राठी यांच्या गळ्यातील सोन्याचे १६ ग्रॅम वजनाचे गंठण ओरबाडून नेले. त्यावेळी राठी यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत सोनसाखळी चोरटे मोटारसायकल भरधाव घेऊन पळून गेले.
घडलेल्या घटनेच्या संदर्भाने राठी या फिर्याद देण्यासाठी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी त्यांना समजले की, सकाळी ९ ते ९.१५ वाजेच्या सुमारास घुलेवाडी येथील साखर कारखाना मराठी शाळा परिसरात वैष्णवी विकास भालेराव यांच्याही गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ३६ ग्रॅम सोने सोनसाखळी चोरांनी चोरून नेले.
Web Title: knots in the women’s necks were scratched
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study