अहमदनगर: दगडाने ठेचून निर्घुण खून; आरोपीला २४ तासांत अटक
Breaking News | Ahmednagar: जुन्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या परप्रांतीय आरोपीला कोतवाली पोलिसांनी २४ तासांत अटक.
अहमदनगर : जुन्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या परप्रांतीय आरोपीला कोतवाली पोलिसांनी २४ तासांत अटक केली. अशोक कुमार अमरजित (रा. बसोली बु., पोस्ट, बसगाव, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा (रा. बांकी, शेजवाडा, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली आहे.
शहरातील काटवन खंडोबा परिसरातील आगरकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपीने अशोक अमरजित यास दगडाने ठेचून ठार मारले. ही घटना मंगळवारी (दि.२१) रात्री घडली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, दीपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सूरज कदम, शाहिद शेख, अतुल काजळे, अमोल गाडे आदींच्या पथकाने आरोपींच्या शोधासाठी दोन पथके केली. रवाना करण्यात आली. आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला पोलिसांनी केडगाव येथून मोठ्या शिताफीने अटक केली.
Web Title: murder by stoning The accused was arrested within 24 hours
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study