Home नांदेड मित्राचा खून करून मृतदेह तलावात फेकला, आरोपी अटकेत

मित्राचा खून करून मृतदेह तलावात फेकला, आरोपी अटकेत

Breaking News | Nanded Crime: मित्राचा खून करून मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना.

killed his friend and threw the body in the lake, the accused was arrested

नांदेड:  आरळी बंगला (ता. बिलोली) येथील गौतम विठ्ठल सोनकांबळे (वय ४०) याचा खून करून मृतदेह तलावात फेकून दिला. ही घटना रविवारी (दि.७) घडली. या प्रकरणी मन्मथ मारोती पंदीलवाड (रा. आरळी बंगला) याला अटक करण्यात आली आहे. धम्मशिला गौतम सोनकांबळे हिने बिलोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी मन्मथ दुचाकी घेऊन गावात फिरत होता. यावेळी गौतमची पत्नी धम्मशिला सोनकांबळे हिने मन्मथला थांबवून माझे पती कुठे आहेत. काल रात्री तु त्यांना बाहेर नेले होते. आणि माझ्या पतीची गाडी तुझ्याकडे कशी काय? अशी विचारणा केली असता मन्मथने मी तुझ्या पतीचा खून केला आहे आणि बिलोलीच्या तलावात फेकून दिल्याचे सांगितले.

त्यानंतर धम्मशिला हिने बिलोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मालगुजारी तलावात शोध घेऊन गौतम याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पाटील करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: killed his friend and threw the body in the lake, the accused was arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here