महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन बदनामीची धमकी
Breaking News | Nashik Crime: महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षाच्या युवतीवर ओळखीच्या युवकाने मित्र आणि मैत्रिणीला बरोबर घेत अत्याचार (abused) केल्याची घटना.
नाशिक: नाशिकमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिडकोतील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षाच्या युवतीवर ओळखीच्या युवकाने मित्र आणि मैत्रिणीला बरोबर घेत अत्याचार केला. अत्याचाराची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत ४५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले. पीडित युवतीने अखेर अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सिडकोत राहणाऱ्या युवतीसंदर्भात मार्चमध्ये महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यावेळी तिच्या वर्गात संशयितासह त्याचे दोन मित्र, एक मुलगी होती. युवती बाकावर बसल्यावर एकाने तिच्या चेहऱ्यावर फवारा मारल्याने ती बेशुध्द झाली. संशयितांनी तिला उचलून एका वाहनातून अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी मारहाण करुन शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराचे छायाचित्रे काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत संशयितांनी एका क्रमांकावरून पीडितेला तिची नग्न अवस्थेतील छायाचित्रे पाठवली. बदनामीच्या भीतीने युवतीने ४५ हजार रुपये आणि तीन ग्रॅम सोन्याचे दागिने संशयिताला दिले. संशयिताने पुन्हा पैशांची मागणी केल्याने पीडितेने अंबड पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटत असून पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीडितेला देता आली नाहीत. मागील काही आठवत नसल्याचे तिने सांगितल्याने तपासात अडचणी येत आहेत. यामुळे संशयिताला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.
मुळात हा प्रकार महाविद्यालयाच्या आवारात तीन महिन्यांपूर्वी घडला. यामुळे सीसीटीव्ही चित्रण मिळणार नाही. काहीच आठवत नसल्याचे मुलगी सांगते. वर्गात ती बेशुध्द झाली असेल तर तिला वर्गातून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेतांना कोणी कसे पाहिले नाही ?, मारहाण करत शारीरिक अत्याचाराचे छायाचित्र काढल्याचे सांगते. परंतु, ते तिच्याजवळ नाही. कुठल्या क्रमांकावरून संपर्क झाला ते सांगता येत नाही, अशा अनेक प्रश्नांची उकल आवश्यक आहे. संशयिताशी तिचे लग्न ठरले होते. मात्र ते मोडले, हा मुद्दा महत्वाचा आहे. संशयिताविरूध्द कुठलाही सबळ पुरावा देता आला नसल्याने अद्याप अटक करण्यात आली नाही.
Web Title: college student was abused and threatened with defamation
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study