धावती स्विफ्ट कार अचानक पेटली, तलाठी बचावले
कर्जत | Karjat: कर्जत येथील बेनवंडी फाटा शिवारात पुलाजवळ स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या कारमधील चालक जामखेड येथील तलाठी हे त्यांच्या सावधानतेने कारच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील तलाठी प्रशांत पांडुरंग जमदाडे हे आपले काम आवरून कर्जतहून राशिनकडे जात असताना त्यांची स्विफ्ट कार (एम.एच. ११ बी.व्ही. ०२९३) बेनवडी फाट्याजवळ आली असताना कारने अचानक पेट घेतला. या कारमधील तलाठी जमदाडे यांनी सावधानता राखत तत्परतेने कारबाहेर पडून राशीन येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी संपर्क साधला. पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे, हेड कॉन्स्टेबल मारुती काळे, तुळशीदास सातपुते, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे आदींनी घटनास्थळी येऊन भेट दिली.
पोलीस निरीक्षक यादव कर्जत नगरपंचायतचा अग्निशामक बंब यांच्या तत्काळ संपर्क करून पोलीस वा ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
Web Title: Karjat Swift car suddenly ignited