वाहन चालकास हत्याराचे धाक दाखवत लुटले
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरात चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी वाहन चालकास लुटल्याचा प्रकार घडला आहे. कोपरगा शहरातील संजयनगर भागातील भाजी मार्केट परिसरात हत्याराचा धाक दाखवत एका वाहनचालकास लुटले.
यामध्ये त्याच्याजवळील मोबाईल व रक्कम काढून घेण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
१० हजार रुपये किमतीचा मोबाईल व २०० रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी दीपक कचरू औताडे याने गुरुवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यामध्ये चोरी, लुटमार, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने प्रशासनाचा वचक दिसून येत नाही.
Web Title: Kopargaon driver was robbed at gunpoint