Home संगमनेर शहरांची नावे बदलून काय होणार, मंत्री थोरातांचा भाजपाला सवाल

शहरांची नावे बदलून काय होणार, मंत्री थोरातांचा भाजपाला सवाल

What will happen by changing the names of cities Balasaheb Thorat 

संगमनेर | Sangamner: भाजप पक्षाकडून समाजात तेढ निर्माण करणार राजकारण केलं जात आहे असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरांचे नावे बदलून काय होणार?  भाजप विकासाच्या दृष्टीने राजकारण करीत नाही. निवडणुका तोंडावर आल्याने भावनिक मुद्दे समोर आणून समाजात तेढ निर्माण करण्याचे विषय आणून राजकारण करू पाहतात अशी टीका महसूलमंत्री तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजपला बोलण्यासारखे प्रश्न राहिलेले नाही म्हणून समाजात तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करत आहेत.  शुक्रवारी यशोधन जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगरध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.

 Web Title: Sangamner What will happen by changing the names of cities Balasaheb Thorat 

1 COMMENT

  1. शहराचं नाव बदलण्याची मागणी ही भाजप कडून नव्हे तर शिवसेनेकडून केली जात आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेबद्दल काय मत असेल ते व्यक्त करावे शिवसेनेकडून औरंगाबाद शहराचे नामकरण करून संभाजीनगर करावं अशी मागणी केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here