Home कर्जत विवाहितेवर उसाच्या शेतात बलात्कार, गुन्हा दाखल

विवाहितेवर उसाच्या शेतात बलात्कार, गुन्हा दाखल

Karjat Rape of a married woman in a sugarcane field

कर्जत: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जत तालुक्यातील एका महिलेवर दुरगाव येथे संजय जायभाव यांच्या उसाच्या शेतात शौचास गेली असता अकरा वाजेच्या सुमारास एकाने तरुणीला धरून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दुरगाव शिवारात संजय जायभाव यांचे उसाचे शेत आहे. या उसाच्या शेतात दुरगाव येथे राहणारी ३२ वर्षीय महिला शौचास गेली असता आरोपी पप्पू अंकुश जायभाय हा उसाच्या शेतात आला आणि त्या तरुणीला धरून तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच हा घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली.

या तरुणीच्या पतीने जाब विचारला त्यावेळी त्याने त्यास धमकी देऊन तेथून पळ काढला. या पिडीत तरुणीने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून आरोपी पप्पू अंकुश जायभाव याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास डीवायएसपी जाधव हे करीत आहेत.  

Web Title: Karjat Rape of a married woman in a sugarcane field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here