दिवाळीच्या पूर्वसंध्येला अपघातात ट्रॅक्टर मोटारसायकलचा अपघात
शेवगाव | Shevgaon: शुक्रवार दिनांक १३ रोजी बोधेगावपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकडी फाट्यानजीक गेवराई राज्य मार्गावर मोटारसायकल आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनाचा अपघात होऊन यामध्ये माध्यमिक शिक्षक आश्रीनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले. मात्र शेवगावला वैद्यकीय उपचार घेत असताना त्यांनी प्राण सोडला. तर लाईट काम करणारे मांदळे मास्तरांचे देखील दिवाळीच्या पूर्वसंध्येला अपघातात निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव गेवराईच्या राज्य मार्गावरील सुकळी येथे रस्त्याने अश्रीनाथ बापूराव जरे हे मोटारसायकल वरून बोधेगाव कडे जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रोलीला जबर अपघात होऊन गोळेगाव येथील भगवान विद्यालयातील विद्यार्थी प्रेमी व लोकप्रिय शिक्षक अश्रीनाथ जरे हे शेतातून बोधेगावकडे घरी येत असताना झालेल्या विचित्र अपघातात जबर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र ते जागीच काही वेळ जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना पुढील उपचारसाठी ग्रामस्थांनी शेवगावला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले मात्र उपचार सुरु असताना निधन झाले. तर गावातील मांदळे मास्तर म्हणून परिचित असलेल्या व्यक्तीचा देखील याच दिवशी नगर भागात अपघात होऊन ते मयत झाल्याने ऐन दिवाळीच्या धामधुमीत सदर दोन्ही घटना घडल्याने बोधेगाव व गोळेगाव भागात शोककळा पसरली आहे.
Web Title: Shevgaon Tractor motorcycle Accident