Home नाशिक कारागृहातील लाचखोर वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

कारागृहातील लाचखोर वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

Breaking News | Bribe Case: ‘फिट फॉर सर्टिफिकेट’, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Jail bribery medical officer in net

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबु अत्तार (४०) असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) हा वैद्यकीय अधिकारी आहे.

तक्रारदार यांचे मित्र नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. शासकीय नियमानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांना शासकीय समिती सोडत असते. मात्र या समितीस कैद्याचे ‘फिट फॉर सर्टिफिकेट’ची आवश्यकता असते. त्यासाठी डॉ. अत्तार व डॉ. खैरनार यांच्याकडे अर्ज केला असता दोघांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचला असता दोघांनी शासकीय पंचासमोर तडजोड करीत तक्रारदाराकडून ४० ऐवजी ३० हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विभागाने दोघांनाही रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

Web Title: Jail bribery medical officer in net

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here