नातेवाईकाने जवळीक साधून केला अत्याचार
Breaking News | Pune Crime: नात्यातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध. (Sexual realation)
पुणे: नात्यातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केली. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2020 ते मार्च 2024 या कालावधीत आरोपीच्या आंबेगाव येथील राहत्या घरी व तसेच पुण्यातील लॉजवर घडला आहे.
याप्रकरणी मयुर जनार्दन आवारे (वय-30 रा. इंदापुर, जि. पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांचा नातेवाईक आहे. त्याने फिर्यादी यांच्यासोबत जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवले. महिलेला घरी बोलावून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Abused by a relative
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study