Home अहमदनगर कोरोना बाबत हे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज नव्या वादात

कोरोना बाबत हे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज नव्या वादात

Indorikar Maharaj in a new controversy by making this statement about Corona

Ahmednagar | अहमदनगर: समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे  अद्याप न्यायालयात प्रकरण प्रविष्ट आहे. अशातच त्यांच्या कोरोना बाबत वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना झाला नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच, तिसरी लाट माळ काढणाऱ्यासाठी असे वक्तव्य इंदोरीकरांनी (Indorikar Maharaj) कीर्तनातून करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

याबाबत तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे, ‘करोना ही महाभयंकर महामारी आहे. सध्या तिसरी लाट येत आहे. याआधी अनेक जणांना करोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच,  परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. ‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत,’ असा आरोप देसाई यांनी केला आहे.

यासंबंधी इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधीसुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे सांगून देसाई यांनी म्हटले आहे.

आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर सरकारने इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल,’ असेही देसाई यांनी म्हटले आहे.

Web Title: Indorikar Maharaj in a new controversy by making this statement about Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here