मराठीवर इतकं प्रेम आहे तर, दुकानांच्या पाट्या सरकारी खर्चातून बदलाव्यात
महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असावे असा निर्णय मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबत व्यापारी संघटना व काही राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला घेतला आहे. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर भाष्य करत सरकारला सूचना केली आहे.
सरकार हे सांगत असेल की आम्ही निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारचे मराठीवर इतकं प्रेम आहे तर त्यांनी आपल्या पैशातून सगळ्या दुकानांच्या पाट्या सरकारी खर्चातून बदलाव्यात,” अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील टीव्ही९ शी बोलताना दिली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दुकानदार त्रस्त आहेत. महामारीच्या संकटात अडकले आहे. कधी लॉकडाऊन होऊ शकतो याचा काही भरोसा नाही. कोणाला काही भविष्य माहित नाही यातच सरकारने सर्वांना दुकानाच्या पाट्या बदलण्यास सांगितले आहे. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या बदलायला हव्यात,” असे जलील भाष्य केले आहे. तसेच त्यांनी ट्वीट करून सवालही विचारला आहे.
असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात, लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का, हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे,” असाही सवाल जलील यांनी ट्विट करत विचारला आहे.
Web Title: Shop Marathi Nameplate Imtiyaj Jalil