संगमनेर: इंदोरीकर महाराजही मराठा आरक्षणाच्या लढ्यात
Marataha Reservation: राज्यात पुन्हा नव्याने अंदोलन, प्रचार चालू झाले, पुढील ५ दिवस कीर्तन सेवा बंद.
संगमनेर : समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले आहेत. त्यांनी आंदोलनास पाठिंबा देत पुढील ५ दिवस कीर्तन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतानाच मराठा आरक्षण लवकरात मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा चांगलाच पेटला आहे. सरकारला ४० दिवस देऊनही अजून ठोस असा निर्णय मिळाला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्याने अंदोलन, प्रचार चालू झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. हा वेळ संपला तरी देखील सरकारने को णतीही पावले उचलली नाहीत. यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसंच जागोजागी मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रॅली काढून जरांगे यांना समर्थन देण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या अंतरवाली सराटी जालना आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी कीर्तन येथील आंदोलनासाठी जाहीर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पाठिंबा देण्यासाठी समाज रविवारी प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख आयोजित कीर्तनात यांनी करमाळा येथे जाहीर केले आहे.
Web Title: Indorikar Maharaj also fought for Maratha reservation
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App