थंडीची लाट सक्रीय; राज्यात या भागांत पावसाचा इशारा
IMD Weather Update | IMD Alert rain: देशाच्या उत्तरेकडे थंडीची आणखी एक लाट सक्रीय झाल्याचं सांगितलेलं असताना काही राज्यांमध्ये मात्र पावसाचा (Rain ) शिडकावा होईल असाही अंदाज वर्तवला- हवामान खात. महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण.
Weather Alert: देशाच्या उत्तरेकडे सध्या हवामान सातत्यानं बदलत असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. हवामान खात्यानं देशाच्या उत्तरेकडे थंडीची आणखी एक लाट सक्रीय झाल्याचं सांगितलेलं असताना काही राज्यांमध्ये मात्र पावसाचा शिडकावा होईल असाही अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईतील काही भागांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली, तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं
हवामान खात्याकडून देशातील 26 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस देशात कडाक्याची थंडी असेल, तर त्यानंतरच्या काळात मात्र थंडी ओसरताना दिसेल असं सांगण्यात आलं आहे. साधारण 26 तारखेपर्यंत पश्चिमी झंझावातामुळं हिमालयातील वातावरणावर याचा थेट परिणाम दिसून येणार असून हवामानाच मोठे बदल अपेक्षित आहेत. परिणामी थंडी काहीशी कमी होतेय तोच दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचलमध्ये काही भागांत पावसाच्या सरी बरसतील.
कोणत्या भागांमध्ये पडणार पाऊस?
हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळं 22 ते 25 जानेवारीदरम्यान पंजाबमध्ये, 22 ते 23 जानेवारीदरम्यान दिल्ली, हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वोत्तर भागामध्ये असणाऱ्या मेघालय आणि आसाममध्येही पावसाच्या तुरळक सरी बसरतील. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये वातावरण ढगाळ राहील तर, काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.
बर्फवृष्टीचा मारा वाढणार…
हिमाचल, लडाख आणि उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचं प्रमाण वाढेल. विशेषत: उत्तराखंडमध्ये पुढील 48 तासांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय काही भागांना बर्फवृष्टीचा तडाखाही बसणार आहे. ज्यामुळं येथील तापमानाच लक्षणीय घट दिसून येईल. उत्तराखंडमध्ये चमोली, उत्तरकाशी, पिथौरगढ, जोशीमठ या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढेल, तर अधूनमधून पावसाच्या सरीसुद्धा बरसतील.
Web Title: IMD Alert rain predations in Maharashtra Mumbai
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App