संगमनेर: सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, १ कोटीच्या विम्यावरही डोळा
Breaking News | Pune Crime: पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या (Lover) मदतीने पतीची हत्या (Kill) घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवड: शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याचा उघडकीस आला आहे. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भादवी 302 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी येथे राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राहुल सुदाम गाडेकर यांच्या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पोलिस पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. याची माहिती राहुल गाडेकर याला झाल्याने दोन्ही नवरा-बायकोमध्ये सतत भांडण होत होते. त्यामुळे सुप्रिया येणे तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि सुरेश पाटोळे यांचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला.
राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपुर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाच टर्म इन्शुरन्स काढला होता, याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याची वेबनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडगे यांना देणार होती. त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.
राहुल गाडेकर याची हत्या केल्यानंतर सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता, तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता. आता या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत. तसचे त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भादवी 302 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Web Title: Husband killed with the help of army lover, eyes on insurance of 1 crore
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study