संगमनेरात गावठी कट्टा व काडतुससह आरोपी जेरबंद
Breaking News | Sangamner Crime: घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टा सह आरोपी घारगाव पोलिसांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टा सह आरोपी घारगाव पोलिसांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसाला मिळताच घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडवा बुद्रुक येथील अनिल शांताराम काढणे यांच्या शेताच्या विहिरीजवळील कोबीच्या शेतात विनापरवाना व बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह आरोपी आढळून आला. अशोक दगडू खेमनर राहणार हिरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सदर भारतीय दंडविधान कलम ३/२५,५,७सह उल्लंघनाप्रमाणे १३५ प्रमाणे कलम लावण्यात आले आहे. सदर कारवाई घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर व त्यांच्या पथकाने केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच संगमनेर डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे घटनास्थळी दाखल होत कारवाई केली आहे.
Web Title: Accused Arrested with gun and cartridges in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study