Home अकोले अकोले पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

अकोले पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

Breaking News | Akole Suicide: पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपली जीवनयात्रा संपल्याची घटना. अकोले शहराजवळील माळीझाप शिवारातील घटना.

Husband commits suicide due to wife's harassment

अकोले: पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपली जीवनयात्रा संपल्याची घटना अकोले शहराजवळील माळीझाप शिवारात घडली आहे. संदीप दिलीप मंडलिक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अकोले पोलिसांत मयत संदीपचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत संदीपची पत्नी रूपाली मंडलिक हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप यांची बहीण उज्ज्वला हिने गोठ्यात दोरीने गळफास घेऊन केल्याचे तिने आत्महत्या बघितल्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर अकोले पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संदीपचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये एवढे सर्व होऊनही बायको सुधारली नाही. त्यामुळे जीवन संपवत आहे. बैठक घेऊन काही उपयोग नाही. कारण मला तिला सोडायचं नव्हतं, ती सुधारावी ही अपेक्षा असा मजकूर लिहिलेला होता.

यानंतर संदीप याचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी त्याची पत्नी रुपाली हिच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यास संदीपच्या मृत्यूस पत्नी रुपाली ही कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. मवत संदीप हा बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या राजूर शाखेत लिपीक म्हणून सेवेत होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या मागे एक मुलगा, आईवडील असा परिचार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक

Breaking News: Husband commits suicide due to wife’s harassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here