Kalsubai: राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद
अकोले | Kalsubai: कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी काही दिवस बंद करण्याचा निर्णय बारी ग्रामपंचायतीने घेतला आहे. ट्रेकिंगसाठी आनंद लुटणाऱ्या पर्यटकांसाठी निराशाजनक बातमी आहे.
पर्यटकांच्या येण्याने गावातील लोकांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कळसुबाई हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. ट्रेकिंग करण्यसाठी पर्यटक येत असतात. ट्रेकिंगचा छंद असलेले पर्यटकांची रेलचेल सुरु असते, तसेच शिखरावर देवीचे मंदिर असल्याने पर्यटन देव दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कळसुबाई शिखर बंद राहणार आहे. स्थानिक नागरिकांना येणाऱ्या पर्यटकांपासून बाधा होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
Web Title: highest Kalsubai peak in the state is closed for tourists