धक्कादायक! शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार, तिघांवर गुन्हा
Pune Crime: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) करण्यात आाल्याची घटना समुपदेशानात उघडकीस आली.
पुणे: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आाल्याची घटना समुपदेशानात उघडकीस आली आहे. शालेय समुपदेशनात अल्पवयीन मुलीने सामूहिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली.
एका सहावी-सातवीत असणाऱ्या विद्यार्थिनिवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना कोंढवा येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे ही बाब शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन प्रकारातून पुढे आली आहे. मुलीने सर्व आपबीती शिक्षकांना सांगितल्यावर या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. ५५५/२३) दिली असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही येवलेवाडी येथे राहते. ती ६ वी किंवा ७ वीमध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होती. यावेळी एका घराच्या खिडकीतून काही तरी वस्तू खाली पडली. पीडित मुलगी ही ती वस्तू देण्यासाठी त्या घरी जात होती. यावेळी घरात असणार्या आरोपींनी तिला घरात ओढून घेतले. त्यांनी आतून कडी लावली. एवढेच नाही तर तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली. यानंतर तिचे कपडे काढून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
या बाबत जर कुणाला काही सांगितले तर तुझे व तुझ्या घरच्यांचे खूप हाल करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे आजवर तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. फिर्यादी ही तिच्या शाळेत असतांना मुलींचे समुपदेशन सुरू होते. यावेळी तिने तिच्यावर घडलेला हा प्रकार शिक्षकांना सांगितला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणी तपास करीत आहेत.
Web Title: Gang rape of school girl, crime against three
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App