बाहेरगावाहून येऊन वेश्याव्यवसाय, आंटीला ताब्यात, दोन मुलींची सुटका, पोलिसांसमोर मांडली व्यथा
Latur Crime: वेश्याव्यवसाय वर (Prostitution Business) पोलिसांची धाड, आंटीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली, बाहेरगावाहून लातूरला येऊन महिला चक्क देहविक्री करत असल्याचे आले समोर.
लातूर : वाढत्या महागाईमुळे अनेक जण बेरोजगार आहेत. परिणामी अनेक जण वाम मार्गाला लागत असल्याचे धक्कादायक चित्र वारंवार समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. बाहेरगावाहून लातूरला येऊन महिला चक्क देहविक्री करत असल्याचे समोर आले. अशाच एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. एका आंटीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. महिलांनी पोलिसांसमोर मांडली व्यथा.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात एक महिला बाहेरगावच्या गरीब घरातील महिलांना बोलावून त्यांना पैशाचे आमिष दाखवून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्याकडून राहत्या घरीच देहविक्री व्यवसाय करून घेत कुंटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला.
पोलिसांनी रात्री उशिरा एक डमी ग्राहक त्या महिलेच्या घरी पाठवला. आणि महिला सापळ्यात अडकली. त्या ठिकाणी कुंटणखाना चालवला जात असल्याची खात्री डमी ग्राहकाला झाली अन् त्याने पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तात्काळ धाड टाकली अन् एका अंटीला ताब्यात घेतलं. तिच्याकडून मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या दोन पीडित महिलांनी त्यांची व्यथा पोलिसांसमोर मांडली. गरिबी वाईट असते साहेब पोट भरण्यासाठी काय काय करावं लागतय. कुठलं कुठं आलो अन् काय करून बसलो. पण साहेब यापुढे असं करणार नाही म्हणून त्यांनी गयावया करत सोडून देण्याची विनंती केली. देहविक्री न करता इतर कोणताही व्यवसाय करू, असा विश्वासही त्यांनी दिला. या दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
Web Title: Prostitution from outside the village, aunt arrested, two girls rescued
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App