संगमनेर तालुक्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
Breaking News | Sangamner: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या साहित्यासह पकडले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी.
संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान शिवारातील हॉटेल यादगार जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या साहित्यासह पकडले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की रात्र गस्तीवर असलेल्या पथकाला वडगाव पान शिवारातील हॉटेल यादगार जवळ काहीजण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. ते येथील सलमान जलील शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याचवेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत फरदीन अनिश शेख (वय 21, रा. जमजम कॉलनी गल्ली नं.9, संगमनेर), मोहम्मद फारुख मोमीन (वय 21, रा. जमजम कॉलनी गल्ली नं. 6, संगमनेर), एक अल्पवयीन मुलगा या तिघांना पकडले. तर हलीम अकबर पठाण (रा. संगमनेर) व अनोळखी हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
या कारवाईत पोलिसांनी वरील दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिरची पूड, सुरी, लाईटर, दोरी, लोखंडी पाईप, कटर, दोन दुचाकी (क्र. एमएच. 15, एचडी.1134, एमएच.17, पी.7360) असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोहेकॉ. आशिष आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ या करत आहे.
Web Title: Gang preparing for robbery Arrested in Sangamner taluka
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study