Home संगमनेर संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर कार जळून खाक, संशयास्पद

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर कार जळून खाक, संशयास्पद

Breaking News | Sangamner: बायपास ला रस्त्याच्या कडेला उसाच्या शेतात महिंद्रा कंपनीची इर्टिगा चार चाकी वाहनाने पेट घेतल्याचे आले समोर.

Four wheeler burnt down on Nashik-Pune highway

संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर खांडगाव आणि संगमनेर खुर्द वैदुवाडी शिवारा लगत बायपास ला रस्त्याच्या कडेला उसाच्या शेतात महिंद्रा कंपनीची इर्टिगा चार चाकी वाहनाने पेट घेतल्याचे त्या ठिकाणाहुन काही येणाऱ्या जाणाऱ्यांच्या निदर्शनात आले.

 सदरच्या घटने संदर्भात प्रत्यक्ष दर्शीयांनी तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे कळविले तोच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब तिन पोलीस कर्मचारी व एक अधिकारी यांना घटनास्थळी रवाना केले घटनास्थळी आलेल्या पोलीस अधिकारी यांनी घटनेची पाहणी केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी अमजत पठाण यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ अग्निशमक पथकाने घटनास्थळी धावघेत पेटलेले वाहन विजवण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेअभावी वाहन जळून राख झाले. मात्र उसाचे शेत वाचवण्यास यश प्राप्त केले असून सदरचे वाहन हे रस्त्यापासून सुमारे ५०० ते ७०० मिटर लांब असलेल्या उसाच्या शेतात पेटत असताना येणाऱ्या जाणाऱ्यांनी लक्ष दिल्या कारणाने तसेच संगमनेर पोलिसांची तातडीची मदत आणि संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचून एका शेतकऱ्याचे उभे पीक वाचवण्यात यश मिळवीले.

सदरचे वाहन हे कोणाचे आहे कोणाच्या नावावर सदर वाहणाचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे हा अपघात आहे किंवा आणखी काही वेगळं प्रकरण आहे याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत वृत्त प्रकाशित होईपर्यंत कुठल्याही स्वरूपाची तक्रार शहर पोलिसात झालेली नाही? सदर घटनेच्या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भान्सी पोलीस हवालदार दाभाडे पोलीस नाईक पटेकर वाहन चालक मोरे यांनी भेट दिली तर संगमनेर नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी उल्हास आडांगळे भागवत वराडे गोरख मंडलिक होते.

Web Title: Four wheeler burnt down on Nashik-Pune highway

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here