Home संगमनेर संगमनेर: तरुणीच्या अंघोळीचे मोबाईलने चित्रीकरण; दोघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर: तरुणीच्या अंघोळीचे मोबाईलने चित्रीकरण; दोघांविरुद्ध गुन्हा

Breaking News |  Sangamner Crime: २७ वर्षीय तरुणीच्या अंघोळीचे मोबाईलने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Filming of young woman's bath with mobile phone

संगमनेर: संगमनेर तालुक्यात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एक अत्यंत संतापजनक घटना घडली. २७ वर्षीय तरुणीच्या अंघोळीचे मोबाईलने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी तुषार तामचीकर व गौरव तामचीकर (दोघे रा. घुलेवाडी) या दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या महिन्याभरापासून संगमनेर तालुक्यातील एका गावात आजीकडे वास्तव्यास होती. आजीच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये ती अंघोळ करत असताना, दरवाजासमोर असलेल्या पेरूच्या

झाडावर एक मुलगा चढून बसलेला व दुसरा खाली उभा असलेला तिला दिसला. कपडे घालत असताना त्या मुलाने तिच्या अंघोळीचे चित्रीकरण मोबाईल फोनवर करत असल्याचे तिच्या लक्षात आले. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर दोन्ही मुले तात्काळ घटनास्थळावरून पळून गेली. पीडितेने लगेचच आपल्या आजी आणि मावशीला संपूर्ण प्रकार सांगितला. परिसरातील नागरिक आरडाओरड ऐकून घटनास्थळी धावून आले आणि

त्यांनी मुलांची चौकशी केली. चौकशीत तुषार तामचीकर आणि गौरव तामचीकर यांची नावे पुढे आली. पीडित तरुणीने तातडीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अशा घृणास्पद प्रकारांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांच्या सुरक्षेला असलेले धोके रोखता येतील आणि समाजात महिलांना सुरक्षिततेची हमी मिळेल.

Web Title: Filming of young woman’s bath with mobile phone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here