Home अहिल्यानगर संगमनेर: जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने घेतले विष

संगमनेर: जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने घेतले विष

Breaking News | Sangamner: जमिनीच्या वादावरून शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना.

Farmer took poison over land dispute

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे जमिनीच्या वादावरून शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रकाश भाऊसाहेब जोंधळे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जोंधळे यांनी दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे निवेदन देऊन आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.

तहसीलदारांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी म्हटले होते की, माझी जमीन वैयक्तीक अडचणीमुळे खाजगी सावकारांना सोड खरेदीच्या करारानुसार तारण दिली होती. कर्ज व व्याजाची परतफेड केली असतानाही या सावकारांनी आपली जमीन परस्पर विकली. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित जमिनीवर खरेदीदाराला कंपाउंड करण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवणेबाबत आदेश दिले आहे. या एकतर्फी व अन्यायकारक आदेशामुळे आपल्या कुटुंबाचे जगणे मुश्किल होणार असल्याने दोन मुली, एक मुलगा, पत्नी असे आमच्या आत्मदहन करण्याची परवानगी दयावी, असे निवेदन ऑधळे यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( दि.२१) विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जोंधळे यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. समजलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या जमिनीमध्ये काही क्षेत्रावर जोंधळे यांचे मंगल कार्यालयाचे पक्के बांधकाम असून उर्वरीत जागेत, परीवारातील पाचही सदस्यांना पार्किंग, स्वागत कमान, गार्डन विजेया पोल व पाण्याची आर.सी.सी. टाकी आहे. जमीन आपल्या ताब्यात असतानाही दुसन्याला कंपाउंड करण्याच्या नावाखाली जमीनीचा ताबा दिला जात असल्याची तक्रार जोंधळे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी आपणास या प्रकरणात कुठल्याही प्रकारची बाजू व पूरावे मांडण्याची संधी दिली नाही, आपल्यावर अन्याय झाला आहे असे जोंधळे यांनी या पत्रात उल्लेख केलेला आहे.

Web Title: Farmer took poison over land dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here