संगमनेरात जिल्हा न्यायाधीश आणि अधिकारी पथक शाळेत तपासणी गेले असता धक्कादायक प्रकार आला समोर
Sangamner Crime: जिल्हा न्यायाधीश आणि अधिकारी यांच्या पथकाला शाळेच्या आवारात जुगारी पत्ते खेळताना दिसून आले.
संगमनेर: संगमनेर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद शाळेत तपासणीसाठी आलेल्या जिल्हा न्यायाधीश आणि अधिकारी यांच्या पथकाला शाळेच्या आवारात जुगारी पत्ते खेळताना दिसून आले. सोमवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास शहरानजीक असलेल्या घुलेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच पत्त्यांचा जुगार सुरू होता, जुगार खेळणाच्या तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल दिलीप तामचीकर (वय २१), शुभम मच्छिंद्र तामचीकर आणि शिया माचरेकर ( तिथेही रा. घुलेवाडी ता. संगमनेर) अशी गुन्हा झालेल्या तिघांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध पोलिस प्रवीण देविदास डावरे यांनी फिर्याद गुन्हा दिली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये न्यायालय वर्ग १३ जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे , संगमनेर पंचायत दाखल समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड हे घुलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तिघेजण शाळेच्या आवारात त्यांचा जुगार खेळ खेळत असल्याचे पथकातील न्यायाधीश घुमरे आणि इतरही अधिकाऱ्यांनी पाहिले. पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डायरे पोलिस कॉन्स्टेबल विशाल करें हे तेथे गेले. यावेळी शुभम तामचीकर आणि शिवा माचरेकर हे दोघे जुगाराचे साधन, पैसे घेऊन पळून गेले. अनिल तामचीकर याला पोलिसांनी पकडले. पुढील तपास पोलिस नाईक संगीता डुंबरे करीत आहेत.
Web Title: district judge and official team went to inspect the school, a shocking incident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App