कॉलेज तरुणीचे अपहरण, विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा
Ahmednagar News: तरुणावर अपहरण व विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल.
राहुरी: राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. राहुरी शहरातून एका कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका तरुणावर विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
तू गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, अन्यथा तुझ्या दाजीला जिवे मारील अशी धमकी देऊन तरुणीचे अपहरण करण्यात आले. आणि पुन्हा राहुरी बस स्थानकाजवळील रिक्षा स्टँडवर सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक अल्पवयीन तरुणी शिक्षणानिमित्त गेल्या दोन वर्षांपासून गोटुंबे आखाडा परिसरात तिची बहीण व दाजी यांच्याकडे राहते. ती राहुरीत कॉलेजमध्ये येता जाता आरोपी तिचा नेहमी पाठलाग करीत असे. दि. १७ रोजी सकाळी आरोपीने त्याच्या एम एच १७ ए जे ५७०७ या वाहनातून पाठलाग केला आणि धमकी देऊन आरोपी राजन सुसे याने तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून राहुरी कॉलेजच्या दिशेने गेला. तरुणाला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने गाडी राहुरी कॉलेज परिसरातून मागे फिरविली व त्या तरुणीला राहुरी बस स्थानकाजवळील रिक्षा स्टँडवर सोडले. घटनेनंतर तरुणीने तिच्या नातेवाइकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
Web Title: Kidnapping of college girl, crime of kidnapping with molestation
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App