नायब तहसीलदार लाचखोरीप्रकरणी अटकेत
bribery case: माती वाहतूक करणारे वाहन सोडण्यासाठी आणि पुढील वाहतुकीसाठी मासिक हप्ता स्वीकारण्याच्या प्रयत्नात निवासी नायब तहसीलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
बुलढाणा : माती वाहतूक करणारे वाहन सोडण्यासाठी आणि पुढील वाहतुकीसाठी मासिक हप्ता स्वीकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोताळा तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
ही कारवाई १० मार्च रोजी तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. तक्रारदाराचे वाहन माती वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आले होते. ते सोडण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी तसेच भविष्यात माती वाहतुकीसाठी १० हजार रुपये मासिक हप्ता ठरविण्यात आला होता.
या प्रकरणाची १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार, १० मार्च रोजी सापळा रचण्यात आला. मात्र, नायब तहसीलदार रावळकर यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार त्यांचे कृत्य गुन्हा ठरविण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Web Title: Deputy Tehsildar arrested in bribery case