Home औरंगाबाद समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, नावे आली समोर

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, नावे आली समोर

Accident: उभ्या ट्रकला खासगी बस धडकली, या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला.

death toll in Samriddhi highway accident has increased

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यावर बस व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातातील आणखी दोघा जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता १४ वर पोहचली आहे.

सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर झाला.

उभ्या ट्रकला खासगी बस धडकली असल्यानं हा अपघात झाला. वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व मयत नाशिक येथील रहिवासी असून मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. नुकतीच मृतांची व जखमींची नावे समोर आली आहेत. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून सातत्यानं अपघात घडत आहेत.

मृतांची नावे-

तनुश्री लखन सोळसे (वय ५)

संगीता विकास अस्वले (वय ४०)

अंजाबाई रमेश जगताप (वय ३८)

रतन जगधने (वय ४५)

कांतल लखन सोळसे (वय ३२)

रजनी गौतम तपासे (वय ३२)

हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०)

झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०)

अमोल झुंबर गांगुर्डे (वय ५०)

सारिका झुंबर गांगुर्डे (४०)

मिलिंद पगारे (वय ५०)

दीपक प्रभाकर केकाने (वय ४७)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत व्यक्त करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला. या घटनेने मनाला अतिव दु:ख झालं. ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रर्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएम केअर फंडमधून 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

Web Title: death toll in Samriddhi highway accident has increased

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here