Home औरंगाबाद धक्कादायक! १५ वर्षापूर्वी घेतलेल्या दीड लाखाच्या कर्जासाठी शेतकरी कुटूंबातील तिघांची आत्महत्या

धक्कादायक! १५ वर्षापूर्वी घेतलेल्या दीड लाखाच्या कर्जासाठी शेतकरी कुटूंबातील तिघांची आत्महत्या

Chhatrapati sambhaji nagar:  केवळ दीड लाखाच्या कर्जासाठी १५ वर्षात तीन जणांनी आत्महत्या (Suicide), समाजाला सुन्न करणारी घटना.

members of a farmer's family committed suicide for a loan of one and a half lakh taken 15 years ago

छत्रपती संभाजीनगर: १५ वर्षापूर्वी आजोबांनी घेतलेले कर्ज तीन पिढ्यानाही फेडता आले नाही. केवळ दीड लाखाच्या कर्जासाठी १५ वर्षात तीन जणांनी आत्महत्या केल्याची समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी व पिकांना हमीभाव नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती फारच बिकट झाली आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून  समोर आली आहे. १५  वर्षांपूर्वी घेतलेल्या दीड लाखाची परतफेड होत नसल्याने एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

दीड लाखांच्या कर्जापायी एकाच घरातील तीन पिढ्यांच्या कर्त्या पुरुषांनी जीवन संपविले आहे. दीड लाखांचे कर्ज गेल्या १५ वर्षातही फेडता येत नसल्याचे वास्तव समोर आल्याने समाजमन सुन्न झालं आहे.

१५ वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने सोमनाथ भोसले या ३० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे याच कर्जासाठी सोमनाथच्या वडिलांनी व मोठ्या भावानेही आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सोमनाथवर येऊन पडलेली होती. कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याची परतफेड कशी करावी या चिंतेने गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. याच विवंचनेतून सोमनाथ पंडित भोसले याने घराजवळील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी फायनान्स कंपनीकडून सोमनाथच्या आजोबांनी कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नसल्याने भोसले कुटुंबातील तिघांना आत्महत्या करावी लागली आहे.

या कर्जापायी २००८ मध्ये वडील पंडित भोसले तर २०१९ मध्ये मोठा भाऊ गजानन भोसले यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता घरातील कर्त्या सवरत्या सोमनाथनेही याच कर्जापायी आपलं जीवन संपवलं आहे.

Web Title: members of a farmer’s family committed suicide for a loan of one and a half lakh taken 15 years ago

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here