Home नाशिक विहिरीत आढळला नऊ महिन्याच्या बाळासह महिलेचा मृतदेह

विहिरीत आढळला नऊ महिन्याच्या बाळासह महिलेचा मृतदेह

Breaking News | Sinner Crime:  विवाहिता आणि तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घराजवळच काही अंतरावर विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली.

Dead body of a woman with a nine-month-old baby was found in a well

सिन्नर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेली सिन्नर तालुक्यातील सोनारी (साबरवाडी) येथील विवाहिता आणि तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घराजवळच काही अंतरावर विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपात असल्याचा संशय माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला आहे.

विवाहितेचे वडील दत्तू सदगीर यांच्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सासू सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. संदीप राजाराम बिन्नर, राजाराम देवराम बिन्नर, मंजुळाबाई राजाराम बिन्नर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. साबरवाडी (सोनारी) येथील पल्लवी संदीप बिन्नर आणि तिची नऊ महिन्यांची मुलगी ज्ञानेश्वरी ही शुक्रवारी (दि.24) संध्याकाळी बेपत्ता झाली होती. याबाबत बिन्नर कुटुंबीयांनी शनिवारी (दि.25) सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र सोमवारी (दि. 27) सकाळी घरापासूनच काही अंतरावर असलेल्या विहिरीत पल्लवी बिन्नरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गावातील महिलांना आढळला.

पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा केली. गावातील नागरिकांच्या मदतीने पल्लवीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर बाळाच्या शोधासाठी पट्टीचे पोहणारे गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले होते. पाणबुडीच्या साह्याने विहिरीत पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना बाळाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार घातपात असल्याचा संशय पल्लवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dead body of a woman with a nine-month-old baby was found in a well

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here