अहिल्यानगर: पेट्रोल ओतून ट्रॅक्टर पेटवला चार जणांवर गुन्हा दाखल
Breaking News | Ahilyanagar Crime: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून पेटवून दिला.
राहूरी: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून पेटवून दिला. ही घटना राहूरी तालुक्यातील मांजरी परिसरात घडली.
मच्छिंद्र गोरख पारखे (वय २५) याने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मच्छिंद्र पारखे हे मनोज बाचकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर अनिकेत अनिल पौळ यांच्याकडून उचल घेऊन ड्रायव्हर म्हणून काम करतो. एक महिन्यापूर्वी मांजरी येथील ऋषिकेश भाऊसाहेब भगत हा मच्छिंद्र पारखे यास म्हणाला होता की, तू मनोज बाचकर यांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करू नको. मी त्यांचा ट्रॅक्टर पेटून देणार आहे. त्यानंतर मच्छिंद्र पारखे हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरुन बांजुळपोई येथून अशोकनगर सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना मांजरी-पाथरे शिव रस्त्यावर आरोपींनी त्याचा ट्रॅक्टर अडविला आणि मच्छिंद्र पारखे याला लाथा-बुक्क्यांनी व उसाने मारहाण केली. नंतर ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला, तसेच ‘तू आमचे नाव सांगितले तर तुला पाहून घेऊ’ असा दम दिला. या घटनेत ट्रॅक्टर जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर मच्छिंद्र गोरख पारखे याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश भाऊसाहेब भगत, संतोष आण्णा कायगुडे, बाबुराव गोधाजी विटनोर (तिन्ही रा. मांजरी) तसेच एक अनोळखी इसम अशा चार जणांवर भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १२६ (२), ३(५), ३२६ (एफ), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Title: Crime registered against four people who poured petrol on the tractor and set it on fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News