Home Accident News ट्रकखाली चिरडून महिला ठार, पदर अडकला अन….

ट्रकखाली चिरडून महिला ठार, पदर अडकला अन….

Breaking News | Nashik Accident: पाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.

Accident Woman crushed under truck and killed

पंचवटी | नाशिक:  मेरी रासबिहारी लिंकरोडवर स्व. प्रमोद महाजन गार्डनजवळ दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकल्याने महिला रस्त्यावर पडली. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. २४) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात एक जण जखमी झाला आहे.

दिंडोरी रोडवरील रहिवासी मायलेक दुचाकीवरून जात होते. प्रमोद महाजन गार्डनजवळ पाठीमागे बसलेल्या महिलेचा मागील चाकात साडीचा पदर अडकला व महिला रस्त्यावर कोसळली. त्याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्या महिलेला चिरडले. अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा जखमी झाला. अपघातात ठार व जखमी मायलेकांची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नव्हती. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या भागातील रस्ता रुंद करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अरुंद रस्त्यावर टाकलेल्या दुभाजकामुळेच अपघात होऊन महिलेचा बळी गेला असा आरोप माजी नगरसेवक प्रियांका माने, धनंजय माने यांनी केला आहे.

Web Title: Accident Woman crushed under truck and killed

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here